You are currently viewing *अयोध्येत मंदिरासाठी पंचवीस दिवसात जमा झाले एक कोटी रुपये*

*अयोध्येत मंदिरासाठी पंचवीस दिवसात जमा झाले एक कोटी रुपये*

अयोध्या – अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या बांधकामासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देशात देणी गोळा करण्यासाठी मोहिम राबवली जात आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी दिला आहे. देशातून जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली. ते कर्नाटकातल्या उडुपीतील पेजावर मठाचे मठाधिपती आहेत.

 

राम मंदिर बांधकामासाठी केंद्र सरकारकडून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मदतीनं ट्रस्ट काम करत आहे. ट्रस्टच्यावतीने देशात 15 जानेवारीपासून देणगी गोळा करण्याची मोहिम सुरु केली आहे.

श्री विश्वप्रसन्न महाराज यांनी सांगितलं की, दक्षिण भारतातील जनतेनं देणगीच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. यामुळे खूप आनंद झाला आहे. निधी गोळा करण्यासाठी बराच प्रवास केला. यावेळी समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी मदत केली आहे. मंदिर उभारणीसाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त मंदिर उभारणं आणि प्रभू रामचंद्रांची मूर्ती स्थापन करणं इतकाच ट्रस्टचा उद्देश नाही. आदर्श, कल्याणकारी असं राज्य प्रस्थापित कऱणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचंही विश्वप्रसन्न महाराजांनी सांगितलं.

मंदिरांच्या जागी अतिक्रमणावर बोलताना विश्वप्रसन्न महाराज म्हणाले की, राज्यातील सर्व मंदिरं संरक्षित करायला हवीत. यामुळे अशा जागांवर कोणी अतिक्रमणाचा विचार कऱणार नाहीत आणि पुढे जाऊन वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा