शिवसेना मालवण तालुका संपर्क प्रमुख पदी राजेश काशिनाथ गांवकर यांची नियुक्ती
मालवण
मालवण तालुक्यातील मसुरे खाजणवाडी येथील राजेश काशीनाथ गांवकर यांची मालवण तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्ती जाहीर करत श्री. राजेश गांवकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नियुक्ती पत्रात म्हटले आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका संपर्क प्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. हा नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, छोटू ठाकूर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

