You are currently viewing शब्दवेडे कवी

शब्दवेडे कवी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दवेडे कवी*

 

लिहीतात कविता

व्यक्त होतात काव्यात

ते शब्दवेडे कवी

शब्दांची जोपासना

साहित्याची उपासना

हेच त्यांचे ब्रीदवाक्य असते

मुळात ते असतातच

शब्दांच्या विश्वात

म्हणून

शब्दांवर प्रेम करतात

शब्दा शब्दांची फुले उधळतात

छेडतात शब्दांची तार

घेऊन शब्दसुरांचे आलाप

गातात शब्दांचेच राग

शब्दांच्या सुगंधाने मंत्रमुग्ध होतात

गुंफतात रेशीम धाग्यांना

रेशमी अलवार शब्दांनी

शब्दांचाच दीप प्रज्वलित करतात

प्रसंगी

शब्दांनाच धार लावून

करतात प्रहार प्रतिकार

शब्दरूपी अस्त्रशस्त्राचा

वापर करून

शब्दातून व्यक्त होणे

ही त्यांची आवड

छंद असतो त्यांचा

शब्दांशब्दांशी खेळण्याचा

म्हणूनच

शब्द शब्दांची जुळवणी करून

मांडतात शब्दांना रचनेत

शब्दातूनच आशय विषय निवडून

देतात सौंदर्य मुर्तरूप

लिहीतात कविता

ते शब्दवेडे कवी…..

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543.

8208667477.

प्रतिक्रिया व्यक्त करा