You are currently viewing आडवली येथे 16 रोजी दिवाळी मिनी बाजार!

आडवली येथे 16 रोजी दिवाळी मिनी बाजार!

आडवली येथे 16 रोजी दिवाळी मिनी बाजार!

वेंगुर्ले

दिवाळी सणानिमित्त ग्रामपंचायत आडवली मालडी कार्यालय व परिसर येथे 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत मिनी एकदिवसीय बाजार भरविण्यात येणार आहे.

या बाजारात दिवाळी उत्सवासाठी लागणाऱ्या फराळ पदार्थ, कोकणी मेवा, धूप, अगरबत्ती, पणती, कंदील, दरवाजा तोरण, इलेक्ट्रिक तोरणे, किराणा साहित्य व इतर आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

हा उपक्रम ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्या वतीने, सर्व स्थानिक बचत गट, व्यापारी वर्ग व ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावे व आपल्या गावात उत्साहाने दिवाळी साजरी करावी असे आवाहन सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा