सैनिक स्कूल प्रवेशासाठी करिअर कौन्सिलिंग कार्यक्रमाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
लेप्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), कमांडंट, सैनिक स्कुल, यशवंतराव भोसले मिलीटरी स्कुल, सावंतवाडी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास पत्रान्वये कळविले आहे. सावंतवाडी येथे लवकरच सैनिक स्कुलची स्थापना होणार आहे. त्याकरीता शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवारत व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी सैनिक स्कूल प्रवेशासाठी करिअर कौन्सिलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक सेवारत सैनिक व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहीतीसाठी लेप्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), कमांडंट, सैनिक स्कुल, यशवंतराव भोसले मिलीटरी स्कुल, सावंतवाडी यांचा Mob No, ९९७१४०५०९९ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्र-०२३६२-२२८८२० वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

