You are currently viewing संवेदनशील पालकत्व.

संवेदनशील पालकत्व.

*संवेदनशील पालकत्व…*
——————–
*पांग्रड येथील मधमाशी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लवु साळसकर यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या वतीने एक लाखाची केली आर्थिक मदत..*

दोन दिवसांपूर्वी पांग्रड, नागमाचे टेम्ब येथे धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात लवु नारायण साळसकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच अन्य सुमारे 40 ग्रामस्थ जखमी झाले होते.
*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांची आणि जखमींची विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत करण्याबाबत सूचना केली होती.*
त्यानुसार आज भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.संध्या तेरसे,भाई सावंत, तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी सभापती किशोर मर्गज, निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे, अमोल मर्गज यांच्या सहित पांग्रड, नागमाचे टेम्ब येतील मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लवु साळसकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी या वाडीतील या हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य नागरिकांची देखील विचारपूस करून त्यांना प्रशासनाच्या वतीने लागणारे सहकार्य करण्याची हमी दिली..
मयत साळसकर यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अंतर्गत मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी मयत लवू नारायण साळसकर यांची पत्नी ललिता लऊ साळसकर, मुलगा सागर लवू साळसकर, मुलगी वर्षा लवू साळसकर, विवाहित मुलगी मनाली संतोष चव्हाण, भाऊ मधुकर नारायण साळसकर तसेच
सुनील मर्गज, अमोल पांग्रडकर, भालचंद्र मर्गज, प्रमोद जाधव, गजानन पांग्रडकर, आनंद कुंभार, नारायण माणगावकर, काशीराम राणे, सुशील जाधव, संतोष चव्हाण, श्याम माणगावकर, गणेश राणे आणि अन्य ग्रामस्थ तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते..
पालकमंत्री यांच्या संवेदनशील वृत्तीसाठी उपस्थित ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा