सावंतवाडीत बी. एस. बांदेकर कॉलेजचा २८वा आकाशकंदिल प्रदर्शन मेळावा सुरु;
युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी –
बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी यांच्या २८व्या वार्षिक “आकाशकंदिल प्रदर्शनाला” १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुरुवात झाली. यंदाचे उद्घाटन युवराज्ञी श्रद्धा लखम सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे चेअरमन श्री. रमेश भाट विशेष उपस्थित होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेले विविधरंगी, कलात्मक व आकर्षक आकाशकंदिल पाहायला मिळत असून, खरेदीचीही सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हे प्रदर्शन १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान नारायण मंदिर, मोती तलावासमोर, सावंतवाडी येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे. दिवाळीनिमित्त घराच्या सजावटीसाठी नवनवीन डिझाईन्सच्या आकाशकंदिलांची खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी सावंतवाडीकरांना मिळणार आहे.

