शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण
कणकवली
श्री गणेश तरुण मित्र मंडळ यांच्यामार्फत गणेशोत्सव निमित्त आयोजित रील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत अनेक तरुणांनी आपली कल्पकता आणि सृजनशीलता सादर केली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धेश चव्हाण, द्वितीय क्रमांक अथर्व रेवडेकर आणि प्रथम जानकर यांनी तृतीय क्रमांक पटकावत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने विजेतेपद संपादन केले. कार्यक्रमास युवा सेना सिंधुदुर्ग सचिव निलेश मेस्त्री, युवा सेना तालुकाप्रमुख सौरभ सुतार, राज पटेल, तसेच मंडळाचे पदाधिकारी, स्पर्धक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय आंग्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे तरुणाईला आपली कला आणि कल्पकता सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच मिळतो. समाजातील सकारात्मकता आणि संस्कार वृद्धिंगत करण्यासाठी हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासोबतच अशा सांस्कृतिक आणि सृजनशील उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचा समारोप मंडळाच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून करण्यात आला.
