*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम गौळण*
गौळण
नेसली गं बाई मी चंद्रकळा नऊवारी
लपून छपून कान्हा माझा पदर धरी
ll ध्रु ll
पाणियासी जाता
कलश डोईवरी
लपून छपून कलंशावरी
कंकर मारी
भिजली माझी काया भिजली नवी नऊवारी
ll 1 ll
नवीन कोरी मोरपंखी होती साडी
कालच नवरात्रीला मोडली घडी
येता जाता शीळ घालीत
हळूच माझा हात धरी
ll 2 ll
काय म्हणावे यासी
बाल लीला श्रीहरी
मुरली मधुर वाजे गाजे मनोहरी
थरथर काया थरथर अधरी
लपविली ह्यांनी वस्त्रे
यमुना तिरी
येता जाता कान्हा माझा पदर धरी
ll 3ll
एका जनार्धनी अखंड ध्यास
श्रीहरी खेळतो गरबा रास
निषाद वाल्मिकी
गणेश व्यास
भगवद गीता रचना मिळे वसुधा घरी
ll 4 ll
प्रा डॉ जी आर प्रविण जोशी
कॉपी राईट
