You are currently viewing लिपिक टंकलेखक पदासाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

लिपिक टंकलेखक पदासाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

लिपिक टंकलेखक पदासाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

 सिंधुदुर्गनगरी 

सैनिक कल्याण विभागाच्या अधीपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (ग-क) एकुण-72 पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी  ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैकिन कल्याण अधिकारी यांनी केले आहे.  

वरील पदापैकी  1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवरामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

ही भरती प्रक्रिया टिसीएस – आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकरण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in    या संकेतस्थळावर दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते  5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा