You are currently viewing आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असेल, तोच जगाच्या स्पर्धेत टिकेल – डॉ. पांडुरंग बरकले

आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असेल, तोच जगाच्या स्पर्धेत टिकेल – डॉ. पांडुरंग बरकले

*आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असेल, तोच जगाच्या स्पर्धेत टिकेल – डॉ. पांडुरंग बरकले*

“युज ऑफ टूल्स अँड सॉफ्टवेअर इन केमिकल सायन्सेस” या एक आठवडा प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

वैभववाडी
दि.१३/१०/२५

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या सहयोगातून दि. ७ ते ११ ऑक्टोबर,२०२५ या कालावधीत ‘युज ऑफ टूल्स अँड सॉफ्टवेअर इन केमिकल सायन्सेस’ या विषयावर एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि.७ ऑक्टोबर रोजी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. डी. बी. शिंदे (सहयोगी प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, श्री.पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी), प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी तसेच महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे उपस्थित होते. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सिरसट यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याकडे झुकलेले आहे, आपणालाही या गोष्टी अंगीकृत असणे अतिशय गरजेचे आहे आणि हीच गरज ओळखून महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी आधुनिक युगात संशोधन, प्रयोग आणि डेटा विश्लेषण यामध्ये संगणकीय साधनांचा व सॉफ्टवेअरचा वापर अत्यंत आवश्यक झाला असून विद्यार्थ्यांनी या माध्यमातून आपली संशोधन क्षमता विकसित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक प्रा. डॉ. डी. बी. शिंदे यांनी जगात राज्य करत असलेल्या विविध मान्यवरांचे अर्थात इलोन मस्क, मार्क झुकरबर्ग यांचे दाखले देत ते या तंत्रज्ञानाशी काही दशकांच्या पूर्वीच सुसंगत झाले असल्याने आज ते सर्वोच्च स्थानी आहेत. आपणही या सर्वांचा आदर्श समोर ठेवून तंत्रज्ञानाशी जोडले जावे असे प्रतिपादन केले.
एक आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दररोज विविध विषयावर तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले यामध्ये डॉ. डी. बी. शिंदे यांनी इंट्रोडक्शन टू केमड्रॉ, केमस्केच, डॉ. प्रमोद माने यांनी गॅस क्रोमॅटोग्राफी व हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, प्रा. मिलिंद सणगरे यांनी एक्सेल व ओरिजिन, डॉ. हेमंत अकोळकर यांनी केमड्रॉ व केमस्केच, तसेच डॉ. शामराव डिसले यांनी किंगड्रॉ व फोटोशॉप अशा विषयांवर मार्गदर्शन सत्रे संपन्न झाली. याबरोबरच विद्यार्थ्यांना हँडसम ट्रेनिंग देखील देण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वतः सॉफ्टवेअर वर काम करून रासायनिक संरचना तयार करणे, स्पेक्ट्रल डाटा विश्लेषण करणे, तसेच आण्विक स्तरावरील अभ्यासाचे प्रात्यक्षिक अनुभवायला मिळाले. या प्रशिक्षण कार्यशाळेला सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
समारोप समारंभ दि. ११ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे सल्लागार डॉ. पांडुरंग बरकले उपस्थित होते, त्यांनी आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयक्यू, इक्यू, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स, यांच्या बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुद्धा अवगत असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा शास्त्र शाखेचे विद्यार्थी म्हणून वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. तंत्रज्ञान वेगाने पुढे जात असताना त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देत *जो आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असेल तोच जगाच्या स्पर्धेमध्ये टिकेल* असे प्रतिपादन केले. यावेळी अशा विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल डॉ. पांडुरंग बरकले यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन करुन यापुढेही असेच कार्यक्रम आयोजिन करावेत असे सूचविले. या कार्यशाळेच्या सांगता समारंभात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्र.प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, समन्वयक व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सिरसट, सचिव प्रा. सतीश करपे, प्रा. केशव पाखरे, प्रा. व्यंकटेश गोपुला, प्रा. कलावती सुतार यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा