You are currently viewing अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच, वैभववाडीच्या अध्यक्षपदी प्रा.एस.एन.पाटील तर सचिवपदी चेतन बोडेकर

अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच, वैभववाडीच्या अध्यक्षपदी प्रा.एस.एन.पाटील तर सचिवपदी चेतन बोडेकर

अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच, वैभववाडीच्या अध्यक्षपदी प्रा.एस.एन.पाटील तर सचिवपदी चेतन बोडेकर

वैभववाडी

वैभववाडीच्या साहित्य कलाक्षेत्राला चालना देण्यासाठी नव्या संस्थेची स्थापना

वैभववाडी शहराच्या साहित्य कला क्षेत्राला चालना देण्यासाठी अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचची स्थापना करण्यात आली आहे. सदर संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.एस.एन.पाटील तर सचिवपदी चेतन बोडेकर यांची निवड करण्यात आली असून येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संस्था स्थापन करणे, त्याचा उद्देश ठरविणे आणि कार्यकारणी निश्चित करणे यावर सविस्तर चर्चा करून यासंदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच स्थापनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील लेखक – कवी व साहित्यप्रेमींची बैठक वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीला रवींद्र पवार, प्रा. एस. एन.पाटील, सुधाकर पुरीबुवा, चेतन अंबाजी बोडेकर, प्रफुल्ल जाधव, संदेश तुळसणकर, मारुती कांबळे, शैलेंद्रकुमार परब उपस्थित होते. यावेळी वैभववाडी शहरातील साहित्यिक कला क्षेत्राला अधिक गतिमान करून नव्या साहित्यिक कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली व अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच” नावाने विचारपीठ स्थापन करण्यात आले. यावेळी संस्थेची कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष- प्रा. एस. एन. पाटील, उपाध्यक्ष- सुधाकर पुरीबुवा, सचिव-चेतन अंबाजी बोडेकर, सहसचिव- संदेश तात्या तुळसणकर, कार्याध्यक्ष-श्री.रवींद्र पवार, खजिनदार- प्रफुल्ल जाधव, प्रसिद्ध प्रमुख मारुती कांबळे, सल्लागार- सफरअली इसफ, सल्लागार- शैलेंद्रकुमार परब आदींची निवड करण्यात आली.
यावेळी नोव्हेंबर मध्ये साहित्यिक कार्यक्रम घेऊन तालुक्यातील साहित्यिकांबरोबर जिल्ह्यातल्या साहित्यिकांनाही निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी सदर संस्थेच्या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी पाठबळ द्यावे असे आवाहनही
अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा