येत्या बुधवारी संपूर्ण सावंतवाडी शहर होणार खड्डे मुक्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या मागणीला यश.
सावंतवाडी
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात लक्षात घेऊन मागील तीन वर्षापासून ते आतापर्यंत सावंतवाडी शहरात व शहरातील अन्य भागात ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत होते पुन्हा अपघात होऊ नये म्हणून ते खड्डे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने बुजवण्यात आले होते तसेच शहरातील 70 गतिरोधकांना पांढरे पट्ट्यात देखील मारण्यात आले होते. परंतु सर्वच खड्डे बुजवणे संस्थेला परवडण्यासारखे नव्हते त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून नगरपरिषद, सावंतवाडी बस स्टॅन्ड व बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवा अन्यथा आंदोलन केले जाईल असे आवाहन केले होते त्यावेळी सावंतवाडी बस स्टॅन्ड येथील तात्पुरत्या तत्त्वावर खड्डे बुजवण्यात आले तर नगरपरिषदेने येत्या बुधवारी सावंतवाडी शहरातील ठिकठिकाणी पडलेले सर्वच खड्डे बुजवून सावंतवाडी शहर खड्डे मुक्त करणार असे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी रवी जाधव यांना आज फोन वर संपर्क साधून कळवले आहे. “खड्डे मुक्त सावंतवाडी शहर” ही मोहीम राबवत असताना ज्या ठिकाणचे खड्डे बुजवले गेले नाहीत तर त्या ठिकाणच्या संबंधितांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन रवी जाधव यांनी केले आहे. हा उपक्रम राबवणाऱ्या नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

