*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”संगीत साधना”*
ईश्वर राहत असतो संगीत महालांत
संगीत उपासना ईश्वराशी करी संवादIIधृII
वीणा तानपुऱ्यावर गाता येती स्पंदन
गायक ईश्वराला आळवतो साधनेनं
करीता श्रवण जन होती सृजन संपन्नII1II
शांकर भाष्यांत नोंदवले आहे ब्रह्म सूत्र
शंकराचार्य सांगती परमात्मा करी गायन
रामदास स्वामी म्हणती धन्य कला गायनII2II
मनात भक्तीचा भाव संगीत करिते निर्माण
चित्ती वैराग्य भावना येते विसरतो मीपण
संगीत करीते मनोरंजन शक्ती प्रदानII3II
कोकिळेच्या कंठात आहे विश्वनाद संगीत
झऱ्यांत सप्त नादांत संगीत वेणू सुरांत
सृष्टीचे कणाकणांत भरले आहे संगीतII4II
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
