You are currently viewing आत्मविश्वास

आत्मविश्वास

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आत्मविश्वास*

पंधराक्षरी काव्यरचना

 

मनात एक धरुनि आस

ठेविली खास,

कोणतीही गोष्ट नक्की करायची झाल्यास,

त्याचा विचार विनिमय हवा आधी करावयास

तेंव्हाच जागृत होईल खरा

आत्मविश्वास.

😌

जेव्हा माणूस होतो खराच

आत्मनिर्भर

आपोआप जागृत होतो

वैचारिक थर,

जे काही करायचे, अभ्यास

असो की, खेळ

लक्ष केंद्रित करावे आपल्या कामावर .

😌

जर आपण मानू हार घेऊन

माघार

नाही कुणी विचारणार न

मदतगार,

तेंव्हा मनाने निश्चिंत होऊन

व्हा खंबीर

आत्मविश्वास कमावण्यास

नको उशीर.

🙂

कोणतेही आवडते काम व्हावेच खास

अवघड काम गरजेचे,

हवा विश्वास,

काम करा नको अहंकार,

अंधविश्वास

सच्च्या मनाने ठेवा स्वतः चा

आत्मविश्वास.

☺️

नित्यजागृत रहा भोवतालच्या जगात

नीरक्षीरविवेक बुद्धी वागे जीवनात,

अडकून पडे कां, फसव्या चक्रव्यूहात

गुंतुनपडू नका गोडबोलत्या जाळ्यात .

😊

राग, लोभ, मोह, माया, मत्सर दूर सारा

जीवनी सारी कडे अडथळ्यांचा पसारा,

जिंकाल संकटप्रसंगी दोन

हात करा

एकवटून आत्मविश्वासाचा खेळ न्यारा.

 

😇😇😇😇😇😇😇😇

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर, विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा