*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चेंगरलेली माणसं ..माझ्या वहीत..!*
इमारतीच्या खाली चेंगरलेली माणसं
मी बघतो ..दबलेली प्रेत बघतो
तेव्हां मी माझ्या वहीच
एक एक पान फाडून टाकतो
त्या पानांवर माझं नांव टाकतो
पायाखाली तुडवं तुडवत
चेंगरून चेंगरून जीव घेतो
कागदांचा लगद्याचा खच
प्रेतांचा भास मला देतो
त्या कुटुंबाचा आक्रोश कानी येतो
वहींच्या स्पंदनाने पानेही संपलीत
चेंगरून गुदमरणार रख्खं मरण
कागदांनाही ..सहन नाही होतं
माझं लिहलेलं.. नांव ही
आतडं… कुरतडत जात
माणसं चेंगरतात मरतात
कुणालाही कांही घेणंदेणं नसत
एरवी मोठं वाटणार स्मशानही
तोकड वाटायला लागत
अश्या क्षणी घुसमटीच जगणं
शेवटी वहीतच बंद कराव लागतं
फिक्या रडण्याची ओळ
खोल उमाळ्याची नाही
सुक्या.. मायेचं दाटणं
ओळ.. उमटतचं नाही
मुक्याने..मेलेले जीव
मला..सोडत ..नाही..
बाबा ठाकूर धन्यवाद
ठाकूरी उवाच सादरीकरणाची
सत्य घटनेवर आधारित..
