*हिर्लोक सारख्या ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी ग्रामपंचायत घेत आहे – – – मा आमदार वैभव नाईक!*
कुडाळ (प्रतिनिधी)
हीर्लोक गावातील नागरीकांची काळजी विकासाबरोबर आरोग्याची पण या ग्रामपंचायतीने घेऊन सरपंच सौ प्राची सावंत व उपसरपंच नरेंद्र राणे यांनी आयुष गोवा आयुर्वेद माफत शिबीर घेऊन आरोग्याची पण काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काढले
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा आणि ग्रामपंचायत हीर्लोक यांच्या वतीने आयुर्वेद शिबीर व चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी श्री नाईक बोलत होते
यावेळी श्री नाईक बोलताना म्हणाले हीर्लोकला विकासाच्या प्रगतीकडे नेण्यासाठी ग्रामपंचायतीने सातत्याने प्रयत्न केले व सरपंच सौ प्राची सावंत आणि उपसरपंच नरेंद्र राणे यांनी गावातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी पण घेऊन आजचे हे शिबीर भव्य दिव्य असे पाहुन नागरीकांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला याचा अर्थ नागरीकही गावातील प्रत्येक चांगल्या गोष्टीला प्रतिसाद देत आहेत असेही श्री नाईक यांनी आवर्जून सांगितले
यावेळी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सरपंच सौ प्राची सावंत यांच्या हस्ते व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अतुल बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, युवासेनेचे अमित राणे, मुकुंद सरनोबत, सरपंच सौ प्राची सावंत उपसरपंच श्री नरेंद्र राणे, ग्रामपंचायत सदस्य विलास सावंत, माजी सरपंच सौ कन्याश्री मेस्त्री, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय परब, विशाल परब, माजी पोलीस पाटील मोहन कदम, पोलीस पाटील दीपक कदम, ग्रामपंचायत कर्मचारी शेखर शिर्के, भाई परब, प्रदीप दळवी, आदेश परब, गणेश चव्हाण, मंगेश परब, दीनेश सावंत, संदीप सावंत, शामराव जाधव, दीपक परब, संदेश आचरेकर, पोलीस पाटील राजेश जानकर, सुशांत परब, चंद्रकांत परब, हरिश्चंद्र परब, विजय मेटकर, रमाकांत मेस्त्री, व हीर्लोक पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
