हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ दोडामार्गमध्ये ‘महारॅली’
दोडामार्ग
हिंदुरक्षा महासमितीच्या वतीने हिंदूंवरील वाढते अत्याचार आणि दोडामार्ग तालुक्यातून होणारी गोमांस वाहतूक पूर्णपणे थांबवण्याच्या मागणीसाठी, तसेच हिंदुत्वासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ, दोडामार्ग शहरात आज भव्य हिंदू एकता ‘महारॅली काढण्यात आली या रॅलीत दोडामार्गवासीय व इतर संघटनां मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यात महिलांची उपस्थिती मोठी होती
हिंदुरक्षा महासमितीचे कार्यकर्ते गणेश गावडे,भारत माता की जय सघठना सस्थापक गोवा अध्यक्ष सुभाष वेलीकर, मराठा महासंघाचे उदय पास्ते गावडे जिल्हा अध्यक्ष शिवप्रतिस्थान मंगेश पाटील प्रकाश गवस विनित्ता देसाई आदी उपस्थित होतो
यावेळी गणेश गावडे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते गेली सोळा दिवस तुरुंगवास भोगत आहेत. आतापर्यंत इथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना जे सहकार्य केले, ते राज्यात कुठेही दिसून येत नाही. या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही भूजीहाद, लव्हजिहाद, थुंक जिहाद, गोमांस तस्करी आणि धर्मांतरण यांसारख्या प्रकरणांची माहिती वेळोवेळी पोलिसांना दिली होती आणि त्यांना मदतही केली होती.
गावडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, असे काय घडले की, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर भयंकर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली?
कर्नाटक राज्यातून दोडामार्ग मार्गे गोमांसची तस्करी होत असेल, तर याची खबरदारी घेणे हे प्रशासनाचे आणि पोलीस यंत्रणेचे काम आहे. तरीही तालुक्यातून अनेक वेळा गोमांस तस्करी होत असल्याचे दिसत आहे.
“आमच्या कार्यकर्त्यांवर झालेले हे आरोप आणि गुन्हे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या सोळा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले, त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो,”
देशात जर काही चुकीचे घडत असेल आणि त्याबाबत पोलिसांना सूचना देऊनही ते थांबत नसेल, तर यापुढे पोलिसांनी दखल घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला.
हिंदू राष्ट्राकडे जर कोणी खेळ करत असेल, तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही,” असा ठाम निर्धार गावडे यांनी व्यक्त केला.
या ‘हिंदू एकता रॅली’मध्ये हिंदू धर्माशी निगडीत असलेल्या सर्व संघटना, सामाजिक संस्था, संप्रदाय, मंदिर समित्या, कला-क्रीडा-सांस्कृतिक मंडळे, युवाशक्ती, मातृशक्ती आदी सर्व हिंदू बांधवांनी सहभागी झाले होते
ही रॅली राष्ष्टोळी मंदिर (सावंतवाडा) ते दोडामार्ग मुख्य चौक आली असताना अनेक हिंदू बांधवानी जोरदार घोषणा बाजी केली यावेळी सरकारला इशारा देण्यात आला
