*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एकदा काय झालं?*
पाऊस आला जोरात
डराॅव डराॅव करत
बेडकांची निघाली वरात
उड्या मारती तळ्यात!
तळे गेले तुडुंब भरुन
मासे मारती उड्या
पाऊस जोरात वरुन
मुले सोडती होड्या !
डुगु डुगु चालत ये कासव
पाठीवर बसली गोगलगाय
सशाच्या उड्या भरधाव
हिरवा चारा खाई गाय!
एकदा काय झालं,
पावसाची हरवली छत्री
जोरात वादळ आलं
पळते खारुताई भित्री!
बदके सारी गंमत पाहती
पिले पॅक पॅक करती
शुभ्र हंस जोड्या फिरती
कमळे तळ्यात डुलती!
एकदा काय झालं,
जोरात वादळ आलं
सैरावैरा पळापळीत
चिमणीच घरटं पडलं!
माकडानी अलगद झेललं
जंगलाचा वायदा मोठा
प्राण्यांचं सरंक्षण रानातलं
एकमेकांनी सावरुन धरलं
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार.

