You are currently viewing आम. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पोखरण बौद्धवाडी रस्त्यावर साकव बांधकामासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

आम. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पोखरण बौद्धवाडी रस्त्यावर साकव बांधकामासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे साकव बांधकाम करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार समाजकल्याण विभागामार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाची सुरुवात होणार आहे. या कामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, तसेच आमदार निलेश राणे यांच्याकडेही स्थानिकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या कामाची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून या साकवामुळे पोखरण बौद्धवाडी ग्रामस्थांचा मोठा प्रश्न सुटला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा