You are currently viewing बलात्काराच्या आरोपातील आरोपीची न्यायालयीन कोठडीतून जामिनावर मुक्तता

बलात्काराच्या आरोपातील आरोपीची न्यायालयीन कोठडीतून जामिनावर मुक्तता

बलात्काराच्या आरोपातील आरोपीची न्यायालयीन कोठडीतून जामिनावर मुक्तता

जामिनासाठी अ‍ॅड. अशपाक शेख यांचा युक्तिवाद न्यायालयाने केला मंजूर

दोडामार्ग

बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या हम इसाक खेडेकर (वय २५, रा. मुस्लीमवाडी, साटेली-भेडशी) या संशयितास ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५०,०००/- रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे.

हा गुन्हा IPC 2023 अंतर्गत कलम 64(1), 351(2) प्रमाणे दाखल करण्यात आला असून फिर्यादीने सादर केलेल्या तक्रारीनुसार एप्रिल 2022 ते जुलै 2025 या कालावधीत मालवण व साटेली-भेडशी येथे संशयिताने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच धमकी देणे, अफवा पसरवणे, आणि खाजगी फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणात आरोपीस १७ सप्टेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर आरोपीस प्रथम पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयीन कोठडीत स्थानांतरित करण्यात आले.

आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अशपाक शेख यांनी युक्तिवाद सादर केला, जो मा. न्या. व्ही. एस. देशमुख (जिल्हा न्यायाधीश, ओरोस) यांनी ग्राह्य धरत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपीच्या जामिनावर मुक्ततेचा आदेश दिला. या खटल्यात अ‍ॅड. नामदेव मठकर, अ‍ॅड. पंकज खरवडे व अ‍ॅड. विनय रजपूत यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा