*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रेम.. प्रेम… प्रेम… प्रेम….*
केव्हा कधी उफाळेल नाही त्याचा नेम
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम..
प्रेमाची ही नजाकत अहा रे अहा
मागून ते मिळेना हो मागून पहा
असे जडते की समजतंच नाही
चोरून ती इकडे नि तिकडे पाही…
हवेवर तरंगते सोडते भूमी
भेटण्याच्या कल्पना त्या सुचती नामी
पाण्यातले प्रतिबिंब झुरते जेव्हा
आसवे ही पडतात पाण्यात तेव्हा…
उकरते जमिन हो कुणी ती जागी
खुदू खुदू हासतो तो उद्यानी बागी
तरसती दोघे पहा भेटण्या साठी
जमूनच येती अंतरंगात गाठी…
प्रेम एक भावना शब्दात न येते
प्रत्येकाच्या हृदयी हुरहुरंच लावते
किती गोड लडिवाळ समर्पण सर्वस्वाचे
मागतच नाही काही प्रेम नाव त्याचे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

