You are currently viewing भाजपा सिंधुदुर्ग आयोजित ” प्रबुद्ध संमेलनात ” बोधगया : सत्य आणि विपर्यास पुस्तकाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते प्रकाशन

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित ” प्रबुद्ध संमेलनात ” बोधगया : सत्य आणि विपर्यास पुस्तकाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते प्रकाशन

*भाजपा सिंधुदुर्ग आयोजित ” प्रबुद्ध संमेलनात ” बोधगया : सत्य आणि विपर्यास पुस्तकाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते प्रकाशन_*

*संविधान कधीच कोणीच बदलू शकत नाही : ॲड. संदीप जाधव यांचे कणकवली येथे प्रतिपादन*

“संविधान बदलणार, मनुचे राज्य येणार” असा भावनिक विषय घेऊन देशातील शोषित घटकांना विशेषतः बौद्धांना भडकविण्याचे प्रयत्न झालेत. परंतु बौद्ध व शोषित समाजाचे संविधानावर व्यापक प्रबोधन करून “संविधान कधीच कोणीच बदलू शकत नाही याची भक्कम तरतूद संविधानातच आहे” हे जनतेसमोर मांडले. भविष्यातील याचा विपर्यास आणि त्यामुळे होणारे नुकसान हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व उच्च न्यायालयाचे वकील, लेखक ॲड. संदीप जाधव यांनी कणकवली येथे केले.

कणकवली येथील नीलम कंट्री साइड येथे आयोजित केलेल्या ” प्रबुद्ध संमेलनात ” , बोधगया : सत्य आणि विपर्यास या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डाॅ. मिलिंद कुलकर्णी , प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , डाॅ.गुरु गणपत्ये , डाॅ.रामचंद्र चव्हाण , डाॅ.सुहास बीले , वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रोहीत रावराणे , उपनगराध्यक्ष प्रदिप प्रकाश रावराणे , महीला मोर्चाच्या प्राची तावडे ,सानिका सुनिल रावराणे , नेहा दिपक माईनकर , संगिता चव्हाण , मंदार दिलीप रावराणे , सुरेश सावंत , मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर , अमित साटम , देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ , स्वरुप पाटणकर , मयुरेश गोखले , हर्षदा वाळके , दिनेश मुद्रस , अशोक कांबळे , देवदत्त कदम , समिर मुरवणे , जितेंद्र चिकोडी , सुदेश राणे , सुधीर झाटये आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान वक्ते आणि लेखक ॲड संदीप जाधव यांच्या बोधगया : सत्य आणि विपर्यास या पुस्तकाचे प्रकाशन ” सेवा पंधरवाडा ” जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ॲड. संदीप जाधव पुढे म्हणाले की, वास्तविक जेव्हा ‘महाबोधी मंदिर कायदा, १९४९’ अस्तित्वात आला, त्यावेळी सर्वप्रथम बोधगया मठातील महंतांचाच या कायद्याला विरोध होता, जेणेकरून सदरील कायदा रद्द झाल्यास महाबोधी महाविहारावरील वर्षानुवर्षे असलेला हिंदू महंतांचा ताबा, नियंत्रण, हिंदू धर्माचेच वर्चस्व व एकाधिकारशाही विहारावर कायमस्वरूपी अबाधित राहील. परंतु, ‘महाबोधी मंदिर कायदा, १९४९’मुळेच महाबोधी महाविहारावरील बौद्ध धर्मीयांची असलेली आस्था व बुद्धकाळापासून असलेले वर्चस्व टिकून राहून, त्याला खर्‍या अर्थाने संरक्षण प्राप्त झाले. याच कायद्यामुळे हिंदू धर्मीयांच्या ताब्यातून महाबोधी महाविहाराची कायमस्वरूपी सुटका झालेली असून, महाबोधी महाविहार ही तपोभूमी बौद्ध धर्मीयांसाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे उगमस्थान झालेले आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, खरी वस्तुस्थिती असतानादेखील सद्यस्थितीमध्ये बौद्ध धर्मीयांकडून सदर कायदा रद्द करण्याची मागणी सातत्याने करणे, हे संयुक्तिक व योग्य ठरेल का? बोधगया मठातील महंत महाबोधी महाविहार जे मालकी हक्काचे वर्चस्व गाजवीत होते, या कायद्यामुळे ते वर्चस्व संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे १९४९चा कायदा रद्दा झाल्यास, बौद्ध समाजाला फायदा होणार की नुकसान, याचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच, महाबोधी महाविहार हे हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माच्या धार्मिक ऐय, सद्भाव, सलोख्याचे द्योतक आहे. भगवान तथागतांच्या कृपेने सर्वांचे मंगल होईल. मात्र, पुन्हा एकदा सांगतो की, १९४९चा कायदा रद्द झाल्यास बौद्ध समाजाला फायदा होणार की नुकसान, याचा विचार करणे आवश्यक आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग भाजपा ने केले होते. प्रारंभी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा