सामाजिक जाण असणाऱ्या सुसंस्कृत व अनुभवी माऊलीला सावंतवाडीकर नगराध्यक्षपदी बसवतील-रवी जाधव.
सावंतवाडी
नगराध्यक्ष,नगरसेवक आणि समाजसेवक हे जनसेवेचे प्रमुख अंग आहे. जनतेच्या अनेक समस्यांचे निरासरन करणे व त्यांना मूलभूत हक्क मिळवून देणे हे नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने 50 टक्के महिलांना आरक्षण दिले म्हणूनच आज सिंधुदुर्गाच्या नगरपरिषद व पंचायत समिती निवडणूकी मध्ये महिलाराज पाहायला मिळतोय.
जशी एखादी स्त्री घर- कुटुंब सांभाळते तसेच हे सावंतवाडी शहर सांभाळण्यासाठी एक सुशिक्षित-सुसंस्कृत अनुभवी व सामाजिक जाण असलेल्या माऊलीची या उपरलकर पाटेकरांच्या भूमीमध्ये निवड झाली आहे जी पुढे या शहराचे प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे नक्कीच करेल.
गेली चार वर्ष रिकामी असलेल्या खुर्चीला व शहरातील जनता तसेच गोरगरीब व्यापाऱ्यांना न्याय देईल अशी आशा व्यक्त करतो.
ही भूमी प्रत्येकाला योग्य संधी देते आणि प्रामाणिकपणे काम करून त्या संधीच सोनं करण्याची पात्रता ज्याच्या अंगी असेल त्याला कोणीही थांबवू शकत नाही हे या भूमीच वास्तव आहे. निवडून येणाऱ्या माऊलीला व सर्व नगरसेवकांना एकच विनंती आपल्या येण्याने या शहरातील जनतेमध्ये आनंद,समाधान व सुख नांदू दे.
.

