You are currently viewing स्त्री व्यथा

स्त्री व्यथा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्त्री व्यथा*

 

कोण म्हणतं तिला

आहे काही व्यथा

प्रत्येक स्त्रीचीकहाणी

वेगळीच असते कथा…

 

खायला प्यायला आहे

रहायला बंगला

अजून काय हवं

परिसर चांगला…

 

दागदागिने आहेत

पैशाची उणीव नाही

अजून काय हवंय

स्त्रीला तरी काही…

 

तिला विचारतं कोण

मनाच्याच सर्व गोष्टी

ऐकून घेते बिचारी

मनात होते कष्टी…..

 

मीच होते गार्गी मैत्रेयी

मीच ती बुध्दीमान सावित्री

यमालाही जिंकले मी

युक्तिवादाची होती खात्री…

 

आक्रमणे युध्द घडती

झाले मी असुरक्षित

बंदिस्त झाले कधीच

ना कळले चार भिंतीत…

 

विसरले माझे स्वत्व

हरली ती बुध्दीमत्ता

संरक्षण सुरक्षेत

पुरुषाच्या हाती सत्ता….

 

बदलला काळ किती

पुन्हा झाली पराधीन

घराचाच उंबरठा तिला

ओलांडून जाणं कठीण…..

 

करते प्रयत्न पुन्हा आता

शिक्षण विद्या निकराने

मन जाणावे कुणी

वागू दे तिला स्वेच्छेने……

 

बंदिनी ती घरातील

संसाराचक्रात अडकली

पंख कापलेली पक्षीण

पिंज-यामधेच फडफडली..

 

कळो जगालाअस्तित्व तिचे

बुध्दी तेज स्वाभिमान

तिच्या यशाचे करावे

उत्फूर्तपणे जगाने गुणगान..।।

 

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा