You are currently viewing तळकट येथील पैठणीच्या खेळात आरोही शेटकर विजेती तर मानसी राऊळ उपविजेती

तळकट येथील पैठणीच्या खेळात आरोही शेटकर विजेती तर मानसी राऊळ उपविजेती

*तळकट येथील पैठणीच्या खेळात आरोही शेटकर विजेती तर मानसी राऊळ उपविजेती*

*बांदा*

तळकट येथील माऊली मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या खेळात आरोही लक्ष्मण शेटकर हीने प्रथम क्रमांकाची तर मानसी मणिपाल राऊळ हिने द्वितीय क्रमांकाच्या पैठणीची मानकरी ठरली.
शिक्षक मणिपाल राऊळ व अॅटो गॅरैजचे मालक रजत सावंत यांच्या वतीने‌ पुरस्कृत करण्यात आलेल्या या पैठणीच्या खेळात गावातील महिलांनी उत्स्फूर्तफणे सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना आयोजकाकडून भेटवस्तू देण्यात आल्या.या खेळात दरम्यान लहान मुलांसाठी व उपस्थित प्रेक्षक वर्गासाठीही विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन उपशिक्षक जे.डी.पाटील व स्वाती पाटील‌ यांनी केले . कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माऊली देवस्थान कमिटी तळकट व‌ ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा