You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे उमेदवारांसाठी विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे उमेदवारांसाठी विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरतीसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केली आहेत.

सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी बँक गुगल फॉर्म लिंक प्रसिद्ध करीत आहे. बँकेच्या या परीक्षेसाठी आयोजित मार्गदर्शन वर्गाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ करून घ्यावा व सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार असल्याने इतर कुठल्याही भरती संबंधित अफवांना बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षा चांगल्या मार्काने पास करावी व मेरिटमध्ये यावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री मनीष दळवी यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर हे पुढच्या आठवड्यापासून सिंधुदुर्ग नगरी येथे सुरू होणार आहे.

 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbNu6Lft4lQY_7dnyjvHvws81Ec0RXmr9RSiKhlDC8xe4GIw/viewform?usp=header

प्रतिक्रिया व्यक्त करा