हुंबरठ वळणाजवळ प्रचंड खड्डा:
नागरिकांचा संताप, आंदोलानाला वाढतोय पाठिंबा!- अजित नाडकर्णी
फोंडाघाट
फोंडाघाट मार्गावरील हुंबरठ वळणाजवळ सध्या एक भीषण आणि धोकादायक खड्डा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. अंदाजे सहा फूट * दहा फूट एवढ्या मोठ्या आकाराचा हा खड्डा, जणू एखाद्या डंपर खडीनेच भरून निघेल इतका खोल आहे.
या मार्गावरून दररोज लहान मुले शाळेत जातात, सामान्य प्रवासी, कामावर जाणारे नागरिक यांचा ओढा असतो. मात्र सध्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे.
या परिस्थितीविरोधात संतप्त नागरिकांनी आवाज उठवला असून, आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. “मुलांना शाळेत सोडताना काळजात धस्स होतं” अशी भावना एका स्थानिकांनी व्यक्त केली.
सदर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि खड्डा बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

