शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
सावंतवाडी
कवठणी गावात कुमयाचे-भोम परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कवठणी गावातील सुमारे ४०० एकर काजू बागायती जळून खाक झाली.
दुपारची वेळ व जोराचा वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी कवठणी गावातील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रलयात गवताच्या गंजी, भाताच्या राशीही जळून खाक झाल्या. परंतु त्यांच्या डोळ्यादेखत काजू बागायती जळून खाक झाल्याने बऱ्याच जणांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी आग विझविण्यासाठी राजू रेगे, दिगंबर कवठणकर, अरविंद सावंत, सरपंच सुमन कवठणकर, सुधा कवठणकर, सोनू कवठणकर, श्रीधर कवठणकर, वामन कवठणकर, मयूर कामटेकर, स्वप्नील कवठणकर, परेश कवठणकर, सचिन कवठणकर, सुधीर कवठणकर, शामसुंदर कवठणकर आदी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.