*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”परिवर्तन”*
निसर्गाचा नियम आहे परिवर्तन
घडविती पंचमहाभूते सातत्यानं।।धृ।।
समुद्र भरती ओहोटी नित्य नेमानं
जळाचे होती मेघ होते बाष्पीभवन
बरसती ढग सृष्टी होई संपन्न।।1।।
सूर्य चंद्र तारे उगवती नित्यनेमानं
देती ऊर्जा हवा शुद्ध वातावरण
फळे,फुले निर्मिती परागीभवनान।।2।।
बाल तारुण्य वृद्धत्व नैसर्गिक असून
जन्म मृत्यू अटळ सृष्टी चा नियम
मनुष्य मिळवे स्वास्थ्य सदा प्रयत्नानं।।3।।
काळा नुसार लागते बदलावे वर्तन
सत्य टिकते अढळ निकष राहून
गरज शोधाची जननी घडे संशोधन।।4।।
काव्य शब्द संगीत घडवे परिवर्तन
आचार विचार उच्चार करावे चिंतन
उन्नती साधते केल्याने देशाटन।।5।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड, महाराष्ट्र.
पिन410201.Cell.9373811677.

