नारी शक्तीचा सन्मान म्हणजेच खऱ्या नवदुर्गांचा सन्मान
~ डॉ. श्री. सिद्धनाथ घायवट-जोशी यांचे प्रतिपादन
चिंचवड:
येथे स्वामी विवेकानंद विचारमंच यांच्या वतीने ‘सन्मान नवदुर्गांचा’ या उपक्रमांतर्गत “नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2025” या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी विचार मंचाचे कार्याध्यक्ष डॉ. श्री सिद्धनाथ घायवट-जोशी यांनी आपल्या मनोगतामध्ये नारी शक्तीचा सन्मान म्हणजेच खऱ्या नवदुर्गांचा सन्मान आहे अशा अर्थी आपले भाषण व्यक्त केले. नारीशक्ती ही एक अतुल्य अशी शक्ती आहे, नारीशक्तीच्या माध्यमातून अशक्य ही शक्य होत असते. दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या गोष्टी फक्त आणि फक्त नारीशक्तीमुळेच शक्य होत असतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नारीशक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे; आपल्याला जन्म देणारी मातोश्री, आपल्या सोबतच लहानाचे मोठे होत असताना आपल्या प्रत्येक सुखदुःखाचे वाटेकरी असणारी आपली बहीण आणि विवाहानंतर आपल्याला कायमस्वरूपी साथ देणारी बायको ही सुद्धा आपल्यासाठी असणारी एक नारीशक्ती आहे. असेही वक्तव्य डॉ. श्री. सिद्धनाथ घायवट-जोशी यांनी यावेळी व्यक्त केले.
सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमांतर्गत नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2025 या पुरस्काराने ऍड. संगीता बांदल, श्रीमती सुवर्णा घायतडकर, सौ सुवर्णा वाघमारे, श्रीमती कल्पना पवार, सौ. अनुराधा भाटकर, डॉ. वैदेही जंजाळे, श्रीमती विद्या लोंढे, सौ. मनीषा सुतार, डॉ. अश्विनी अत्रे, सौ. श्वेता वाडेकर, कु. सपना ठाकर, सौ. अनुष्का बेंद्रे व कु साक्षी रांजणे इत्यादी महिलांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे व सिने अभिनेते बसवराज बनसोडे, कवयित्री आरुषी दाते, गुरुकुलाच्या प्रधानाचार्य सौ पूनम गुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद विचार मंचाचे अध्यक्ष श्री संदीप बोडके पाटील, कार्याध्यक्ष डॉ. श्री. सिद्धनाथ घायवट-जोशी, सहकार्यवाह दीपक पांडे, सचिव शाहूल साठे, सौरभ कुलकर्णी व जावेद मुल्ला तसेच पुणे सोशल प्लॅटफॉर्मचे पराग जोशी, स्वाती मांडके आदींनी परिश्रम घेतले.

