पुणे :
ज्ञानाधिष्ठ संस्कृती हा विश्वाचा आत्मा आहे. ज्ञानामुळेच मानवी विकास झाला. वाचन संस्कृतीला पर्याय नाही. ज्ञानाला जात, धर्म आणि देश नसतो. म्हणून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर मुक्त वाचनालय नव्ययुगाचे मुक्तद्वार आहे. असे उदगार ज्येष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी रमामाई मुक्त वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
यावेळी साहित्य सम्राट पुणेचे दोनशे दहावे कविसंमेलन आणि मा.नगरसेविका लताताई राजगुरु आणि समाजरत्न शंकर गायकवाड यांचा वाढदिवस अशा कार्यक्रमांचे आयोजन महामाता रमामाई बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वाडिया कॉलेज जवळ पुणे येथे केले होते.
विचारपिठावर माननीय बर्गे, जयदेव गायकवाड, परशुराम वाडेकर, लता राजगुरु, ॲड. विवेकभाई चव्हाण, ॲड. अविनाश साळवे मुख्य आयोजक विठ्ठल गायकवाड आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांच्या मनोगतानंतर साहित्य सम्राट पुणेचे आई या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण कविसंमेलन ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रबोधनात्मक कविसंमेलनामध्ये म.भा.चव्हाण, विनोद अष्टुळ, किशोर टिळेकर, शरयू पवार, लक्ष्मण शिंदे, राहुल भोसले, बाबासाहेब ढोबळे, लक्ष्मी रेड्डी, जनाबापू पुणेकर, छगन वाघचौरे, विजय कावळे, नंदकुमार गावडे, महमुदा शेख, शौकत शेख, थोरात, प्रतिमा काळे, योगिता कोठेकर, भगवान धेंडे आणि विठ्ठल गायकवाड यांनी आपल्या काव्य रचना सादर करून उपस्थिनांची मने जिंकली.
या प्रबोधनात्मक कविसंमेलनाचे सूत्रबद्ध निवेदन विनोद अष्टुळ यांनी तर भावनात्मक आभार विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केले.
