You are currently viewing जंगलात तरुण फोटोग्राफरची आत्महत्या

जंगलात तरुण फोटोग्राफरची आत्महत्या

जंगलात तरुण फोटोग्राफरची आत्महत्या;

वैभववाडी परिसरात हळहळ

वैभववाडी
कुसुर पिंपळवाडी येथील रहिवासी आणि वैभववाडी बाजारपेठेतील ‘संकल्प फोटो स्टुडिओ’चे मालक सचिन सावंत या तरुणाने सोनाळी गावाजवळील जंगलात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन सावंत यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या मागे आई, पत्नी आणि केवळ तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा