You are currently viewing गोडवा मराठी भाषेचा

गोडवा मराठी भाषेचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गोडवा मराठी भाषेचा*

 

माझ्या मराठीचे सौंदर्य

किती लाघवी लावण्य

रूप खुलते असे तिचे

भारत मातेस प्राधान्य

 

भाषा शोभे अलंकारिक

व्याकरणाने सजली

काना मात्रा वेलांटी उकारे

अंगणी रांगोळी काढली

 

उपमा अनुप्रास श्लेष

शब्द सुरांना मिळे साथ

काव्यात मेळ बसवण्या

मिळे यमकाची साथ

 

कथा कादंबरी काव्य

नाटक ललित लेखन

गोडी अविट लाभते

करता मराठी वाचन

 

सौंदर्याने फुलते मराठी

माळ शब्दफुले गुंफिता

हिचा गोडवा चाखावा

बोल बोलता बोलता

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर ,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा