You are currently viewing निव्वळ हा आभास

निव्वळ हा आभास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निव्वळ हा आभास*

 

दिसता मृगजळ

पाण्याचा होतो आभास

निव्वळ भास

तृषार्तास…..

 

सुखाचा आभास

प्रमुदित करतो मनाला

सारतो दुःखाला

दूर……

 

क्षितिजावर सांजवेळी

रंगांचे सुंदर आभास

विलोभनीय खास

दृष्टीपुढे……

 

प्रेमाचा आभास

मोहमयी होतं गारूड

स्वप्न आरूढ

वास्तवावर…..

 

भास आभास

नित्य जीवनात येतात

खरे कळतात

अनुभवतांना….

 

आयुष्य आपले

आभासीच आहे असे

संपले तसे

राख……..।।

 

०००००००००००००००🥀

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा