You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा विभव राऊळ जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत तृतीय!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा विभव राऊळ जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत तृतीय!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा विभव राऊळ जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत तृतीय!

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी ओरोस येथे संपन्न झाली.
‘क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता व आव्हाने’ या विषयास अनुसरून झालेल्या या स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी कु . विभव विरेश राऊळ याने आपले अभ्यासपूर्ण विचार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने प्रभावीपणे मांडले. कु विभव राऊळ याच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याने जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल कु. विभव राऊळ यास मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कु विभव राऊळ यास प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री. मिहीर राणे व श्रीम.फरजाना मुल्ला व श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. संदीप पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल कु विभव राऊळ याचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ. सतिश सावंत , मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा