*घारपी शाळेत बदली झाल्याने शाळेच्या परिसरात झाडाचे रोप लावून कार्याची सुरवात*
*बांदा*
बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेतील महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री जे.डी.पाटील यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद शाळा घारपी येथे झाली .नव्याने हजर होण्यासाठी गेलेल्या या शाळेत श्री जे.डी.पाटील यांनी शाळेच्या परिसरात झाडांची रोपे लावून वृक्षारोपण करत बदली झालेल्या शाळेत आपल्या कार्याची सुरुवात केली.
दुर्गम क्षेत्रात असलेल्या घारपी येथे येथे बदली झाल्याने हजर होण्यासाठी गेलेल्या जे.डी.पाटील यांचे विद्यार्थी,शिक्षक,पालक , शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जे.डी.पाटील यांनी शाळा परिसरात झाडांचे रोपे लावून पर्यावरण संवर्धन जपले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा यशोदा गावडे, ज्येष्ठ नागरिक शिवराम गावडे, शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, स्वाती पाटील, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, ओंकार गावडे,शुभम गावडे,प्रज्योत गावडे, जनार्दन गावडे, सरीता नाईक, चंद्रशेखर कविटकर,अक्षता आसनोकर,संचिता सावंत,संतोष गावडे आदि उपस्थित होते.

