*बांदा कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष चालू करा*
*भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागणीला यश, दुसऱ्या व चौथ्या सोमवारी कक्ष नेमला जाणार*
बांदा(प्रतिनिधी):-
बांदा दशक्रोशीतील जवळपास 15 ते 20 गावातील नागरिकांना वाढीव वीज बिल व इतर समस्यांच्या निवारणासाठी महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयात जावे लागते. तेथे संबंधित अधिकारी उपस्थित नसल्यास वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. ग्रामीण भागातून 30 ते 35 किलोमीटर लांब तालुक्याच्या ठिकाणी जाणे सर्वसामान्यांना त्रासदायक होत आहे. याबाबत बांदा व परिसरातील अनेक नागरिकांकडून बांदा मंडल उपाध्यक्ष गुरू कल्याणकर यांच्याकडे समस्या मांडण्यात येत होत्या. त्याची दखल घेत आज बांदा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाला भेट दिली व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांना कल्पना देत दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी बांदा कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्ष नेमण्याची निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली. यावर महावितरणचे प्रभारी सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर यांनी होणारी गैरसोय मान्य करत 27 ऑक्टोबर पासून दुसऱ्या व चौथ्या सोमवारी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याचे मान्य केले.
यावेळी बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच आबा उर्फ राजाराम धारगळकर, शक्ति केंद्रप्रमुख मनोज कल्याणकर, शहराध्यक्ष बाबा उर्फ नरसिंह काणेकर, , ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, हेमंत दाभोलकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

