कुर्ली वसाहतीत दुर्गा विसर्जन मिरवणुकीने उत्साहात संपन्न; हजारोंचा सहभाग
फोंडाघाट
कुर्ली वसाहतीत दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीने आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. बाजारपेठ मार्गे पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि गणपती घाट येथे विधीपूर्वक दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात आले.
गेल्या 9 दिवसांपासून दुर्गा मातेची भक्तिभावाने सेवा करण्यात आली होती. कुर्ली वसाहतीत दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा मातेची मूर्ती बसवली गेली होती. महिलांचा मोठा सहभाग, पारंपरिक पोशाख, भक्तिगीत, ढोल-ताशांचा निनाद आणि अनुशासित मिरवणूक हे यंदाच्या विसर्जनाची वैशिष्ट्य ठरली.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या पुढाकाराने दुर्गा मातेचे दर्शन, पूजन आणि विसर्जनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तीभावाने पार पडला. संपूर्ण फोंडाघाट परिसरात कुर्ली वसाहतीतील दुर्गा उत्सवाचा विशेष दरारा आणि प्रतिष्ठा असल्याचे दिसून आले.

