*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फुले फुले ही फुलली राया..*
फुले फुले ही फुलली राया या ना जरा हो बागेत
जाई जुई नि शेवंती ही आला मोगरा भरात..
उद्यानाची हो नवलाई लाही लाही ना होणार
टपोर डोळे उघडत पहा हा चाफा आला ना बहरात…
चला जाऊ या उद्यानात
भुंगा रंगलाय हो भजनात
काय सांगतयं फुलं कानात
हातात माळा गजरा माझा ओढून पहा ना कनात..
झेंडू उघळतोय पहा ना रंग
नसला म्हणून काय हो गंध
किती टपोर तो टवटवीत
माळा बघत रहाव्या त्यात
श्रीरंगाच्या गळ्यात खुलती तोरण नाचते दारात..
फुले फुले ही फुलली राई या ना जरा हो बागेत..
दुनिया फुलांची आहे अनोखी
तेथे नाहीच हो गळचेपी
जो तो खुश हो आपल्या जागी
येथे बेरीज ना वजाबाकी
सुगंध राही शिल्लक मागे पहा सुमने आली जोरात
फुले फुले ही फुलली राई या ना जरा हो बागेत.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

