You are currently viewing वेंगुर्ले – शिरोडा वेळागर समुद्रात भीषण दुर्घटना

वेंगुर्ले – शिरोडा वेळागर समुद्रात भीषण दुर्घटना

शिरोडा वेळागर समुद्रात भीषण दुर्घटना: आठ जण बुडाल्याची भीती, तिघांचे मृतदेह हाती

वेंगुर्ले

शिरोडा येथील वेळागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या एका समूहातील आठ जण समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून, चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना तातडीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

दुर्घटना घडताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून उर्वरित बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. बुडालेल्यांपैकी काहीजण कुडाळमधील, तर काही बेळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या समुद्राला जोर असल्यामुळे बचावकार्याला अडथळे येत आहेत. तरीही स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यटन हंगामात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खबरदारीचे उपाय करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा