You are currently viewing सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ

सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन तेलींचा प्रवेश; ठाकरे गट हादरला, भाजपचीही समीकरणे बिघडली

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

मुंबईतील मेळाव्यात झालेला हा प्रवेश अत्यंत गाजला. या पक्षप्रवेशामध्ये सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे.

राजन तेली यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून, दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेतृत्वालाही या घडामोडीने अडचणीत आणले आहे.

हा प्रवेश सिंधुदुर्गच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा