*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृद्धाश्रम*
विचार करता करता सरले साल,
समोर ऊभा राहिला निवृत्तीचा क्षण,
आता पूढे काय ?काही सुचेना,
पळभरात ठरवला एक ‘पण’.
थकलेल्या सौभाग्यवतींना घ्यावे सांभाळून,
घरी रहावे घर बघावे,
दिनक्रम घरचा ऊरकुन,
वृद्धाश्रमात जाऊन यावे.
रोज मी जातो ठरवून,
त्यांच्या डोळ्यात बघतो डोकाऊन,
दु:ख कसले घेतो जाणुन,
बोलतो त्यांच्याशी हळुवार होऊन.
रोज जाऊन तिथे मी रमलो,
त्यांचे थरथरते हात जेव्हा मी घेतो हातात,
‘आपलंस’वाटुन चेहेरा ऊजळतो क्षणात,
खरखरित स्पर्श सुरूकतलेले हात
काय सांचलय यांच्या मनात.
हंसता बोलता मोकळे होती,
गोष्ट सांगता गंमत वाटत हंसती,
टाळ्या देती मौज करती,
थोडावेळ दु:ख व्याधी विसरती.
लहान समजतो मी त्यांना,
मला आईबाबा नसल्याचे दु:खसांगतो,
पेपर छान वाचुन दाखवतो,
बातम्यातुन जगाची सफर घडवतो.
देवळात नेऊनी मनास ऊभारी देतो,
बघता बघता साल संपले,
अनोळखी होते त्यांना माझे समजलो,
मायबाप माझेच म्हणुनी भेटत राहिलो,
ते माझे अन् मी त्यांचा होत गेलो.
सेवा प्रेम आनंद देऊन गेले,
तिर्थक्षेत्री न जाता ,
पुण्य मला मिळाले,
देवानेच मला दर्शन दिले.
अनुराधा जोशी
अंधेरी. मुं. ६९
9820023605

