*शिरोडा मीठाचा सत्याग्रह ठिकाणी भव्य स्मारक होण्यासाठी ग्रामस्थ व इतिहास प्रेमीचे लाक्षणिक उपोषण*
*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख व वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत यांनी दिली भेट*
वेंगुर्ला
इंग्रजांनी मीठावर लावलेल्या जिजीया कराच्या विरोधात महत्मा गांधी यांनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. महात्मा गांधींच्या या सत्याग्रहाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे इंग्रजांच्या जुलमी करा विरुद्ध मीठाचा सत्याग्रह करण्यात आला. या ऐतिहासिक ठिकाणी भव्य असे स्मारक उभारण्यात यावे यासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख व वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
उपोषण कर्त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. सन 2030 साल हे ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. या पूर्वी शिरोडा गांधीनगर येथे सत्याग्रहाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यावे. जमीन हस्तांतरणा पासून ते स्मारक उभारण्या पर्यंत सर्व प्रक्रिया जलदगतीने नियोजनबद्धरित्या पूर्ण करण्यात यावी. जमीन हस्तांतरण प्रक्रिया 26 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. 1930 साली पार पडलेल्या मिठाचा सत्याग्रह विषयीची योग्य व इत्थंभूत माहीती इतिहास प्रेमीना मिळावी या करिता शासनाने पुढाकार घेऊन सत्याग्रह अभ्यास कमिटीची स्थापना करावी. ऐतिहासिक दृष्टीने स्मारकाची उभारणी करताना येथील भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास केला जावा. त्या विषयीचा आराखडा तयार करण्यात यावा. मिठागरे ही शिरोडा गावची शान आहे परंतू मिठ उत्पादन व्यवसायाला नैसर्गिक आपत्तीमुळे उतरती कळा लागली आहे. या मिठ उत्पादन व्यवसायाला शासनाने बळ देऊन उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी. या वेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर कृष्णा आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश परब, दिपक चोपडेकर, माजी सरपंच मनोज उगवेकर, संदिप गावडे, जगन्नाथ डोंगरे, अभिजीत राणे, अण्णा गावडे, विराज राऊत, संदिप राऊत,नारायण गावडे, विशाल गावडे, देवेश गावडे, गोपीनाथ राऊत, तुषार राऊत, प्रवीण धानजी, अशोक परब, राहुल गावडे, आजू आम्ब्रे, राकेश परब, भाऊ आंदुर्लेकर,महादेव परब तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

