You are currently viewing आळवणी

आळवणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आळवणी*

 

करिते वंदन तुला भवानी

नतमस्तक मी चरणापाशी

कृपा प्रसादे सदैव लयलूट

धनधान्याच्या करते राशी

 

तूच पार्वती तूच भवानी

अग्रभागी तव मान पुजेचा

शांत,संयमी,नजरेमधूनी

दे मज आशिष तव शक्तीचा

 

गिरीजा तू अन् तूच पार्वती

तुझ्या कुशीतील आम्ही बालके

भ्रष्टाचारी या दुनियेमध्ये

नको सोडू तू आम्हा पोरके

 

जगदंबा तू तूच शारदा

ज्ञानार्जन कर ज्ञानसंपदा

शिवगौरी तू समर्थ देवी

नकोच कुठली इथे आपदा

 

तुळजापूरची भवानी माता

कोल्हापूरची अंबाबाई

शिवरायांची रक्षणकर्ती

मनी मानसी वसते आई

 

नवमी दिवशी शस्त्रपुजनी

तुझ्या आयुधा मान भूवरी

या शस्त्राचा सौजन्याने

वापर करण्याला ये तू सत्वरी

 

प्रा.मानसी जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा