You are currently viewing “मत्स्य”महोत्सवात खवय्यांची चंगळ; गोड्या पाण्यातील वीस प्रकारचे पदार्थ

“मत्स्य”महोत्सवात खवय्यांची चंगळ; गोड्या पाण्यातील वीस प्रकारचे पदार्थ

अतुल काळसेकर यांची माहिती

सावंतवाडी
सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपालिका आणि निलक्रांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मत्स्य महोत्सवात” खवय्यांना गोड्या पाण्यातील माशांपासून बनविलेल्या पदार्थांची मोठी लज्जत चाखता येणार आहे. यावेळी तब्बल २० प्रकारच्या पदार्थांचा यात समावेश असणार आहे.

याचबरोबर मनोरंजनाचीही जोड याला मिळणार असून निवडक निमंत्रित नृत्य कलाकारांची ४० कोळी गीतांवर आधारित खुली कोळी नृत्य स्पर्धा, महिलांसाठी पाककला व शिल्प कलाकारांसाठी “मत्स्य शिल्प” स्पर्धा घेण्यात येणार आहेत.हा महोत्सव १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होईल,अशी माहिती अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा