You are currently viewing आदिशक्ती

आदिशक्ती

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, पर्यावरण प्रेमी लेखिका कवयित्री अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आदिशक्ती*

 

 

स्त्री आहे आदिशक्ती

स्त्री आहे महान.

धरणी सारखी स्त्रीही

आहे शक्तीमान.

 

स्त्री आहे मूर्तिमंत

लावण्याची खाण‌.

स्त्री म्हणजे प्रेम,माया

या विश्वाचा प्राण.

 

जीवनाचे चक्र

स्त्रीमुळेच फिरते.

नैराश्याच्या पोकळीत

स्त्रीच आनंद भरते.

 

गर्भाला धारण करुन

सहन करते कळा.

पालन पोषण करुन

जग दावते बाळा.

 

स्त्रीच आहे बालकांचा

खरा पहिला गुरु.

अशा या आदिमायेला

चला वंदन करु‌

 

 

अनुपमा जाधव.

प्रतिक्रिया व्यक्त करा