You are currently viewing “साहित्यिकांनी समाजाचे वास्तव मांडावे”- डॉ. श्रीपाल सबनीस

“साहित्यिकांनी समाजाचे वास्तव मांडावे”- डॉ. श्रीपाल सबनीस

चिंचवड :

चिंचवड येथील विज्ञानकेंद्राच्या सभागृहात कुलस्वामिनी प्रतिष्ठान,पुणे यांच्या “गोंदण” दीपावली विशेषांक चे प्रकाशन व त्यानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले की” समाजाचे वास्तव आणि प्रश्न मांडण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. रसातळाला गेलेली राजकीय व्यवस्था, नैतिकतेला हरताळ फासणारी नोकरशाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वर्चस्व वादाची लढाई अशा पार्श्वभूमीवर अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत. शेतकरी, कामगार यांची अवस्था बिकट होत चाललेली आहे. साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समस्यांना वाचा फोडली पाहिजे. दिवाळी अंक हे त्यासाठी उत्तम माध्यम आहे. दिवाळी अंकाची परंपरा हे आपल्या भाषेचे वैभव आहे.”

दीपावली अंकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. कामगार नेते अविनाश वाडेकर, लेखक राजेंद्र घावटे, संपादक पांडुरंग गाडीलकर, जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार माळशिरस्कर यांनी केले. प्रतिष्ठानची एका तपाची वाटचाल कार्याध्यक्ष श्री बापूसाहेब जाधव यांनी विषद केली.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, “गोंदण दीपावली विशेषांक खरोखर सर्व समावेशक लेखाने व साहित्याने नटलेला असून दर्जेदार विषयांचा दिवाळी फराळ असून,भारतीय संविधानाचे उदिष्ट प्रतिबिंबित करणारा आहे. ऑपरेशन सिंदूर चे परिणामपूर्वक दर्शन घडवून कणखर भारतीय संरक्षण, एकात्मता व सर्व धर्म संभावाचा परिणाम दर्शविणारे मुखपृष्ठ श्री गोरे यांनी साकारले आहे.”

मा. प्राचार्य श्पांडुरंग गाडीलकर यांनी गोंदण चे संपादक म्हणून अंकाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे सांगितली.

अविनाश वाडेकर यांनी कामगारांसाठी विविध सोयी सुविधा बरोबर त्यांच्या रास्त, न्याय मागण्यासह, सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

अंकातील दर्जेदार कविता,कथा, आणि लेख एक ते तीन व उत्तेजनार्थ अशी निवड करून त्या साहित्यिकांना पारितोषिकांनी मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.

पाहुण्याचा परिचय श्री विठ्ठल जाधव, श्री दादाभाऊ गावडे, श्री तानाजी गावडे यांनी करून दिला. संभाजीराव चौधरी पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

प्रकाशनानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन जेष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, अरुण बोऱ्हाडे , सचिन बेंडभर,मीनाक्षी पाटोळे, डॉ.नीलम गायकवाड,आकाश भोरडे, सीमा गांधी, विवेक कुलकर्णी, भाऊसाहेब आढाव, मीनल साकोरे, सीमा जाधव, आत्माराम हारे, संभाजीराव चौधरी, जयश्री थोरवे आदी मान्यवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या. काव्यसंमेलनाचे संयोजन साहित्यभूषण,ज्येष्ठ साहित्यिक श्री दादाभाऊ गावडे यांनी केले.

कविसंमेलनाचे बहारदार निवेदन मीनाक्षी डफळ-पाटोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती वाडेकर यांनी केले. आभारप्रदर्शन बापूसाहेब जाधव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा