शोषखड्डा अभियानाचे उद्घाटन श्रमदानातून शोषखड्यांचे बांधकाम पुर्ण करा
– मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर
सिंधुदुर्गनगरी
महिला व पुरुष यांच्या एकत्र सहभाग तसेच स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे. या भावनेने चळवळ उभी राहिल्यास स्वच्छता अभियानाला गती मिळू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग आहे. जिल्ह्यात श्रमदानाच्या माध्यमातुन स्वच्छतेविषय कार्यक्रमांचे आयोजन कायम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होत असते. यामुळेच जिल्ह्याला स्वच्छता क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. “स्वच्छता ही सेवा” (SHS) मोहीम दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्ह्यातील सांडपाणी समुळ नष्ट करण्यासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर तेथे शोषखड्डा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांचा जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत आंदुर्ले, ता. कुडाळ येथे करण्यात आला.
यावेळी आदुर्लेचे सरपंच अक्षय तेंडोलकर, पंचायत समिती कुडाळचे माजी सभापती संजय वेंगुलेकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी अमित मेश्राम, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) सुदेश राणे, गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत आदुर्ले, ता. कुडाळ येथील 76 वर्षीय शालिनी राजाराम मेस्त्री यांनी सांडपाण्याचे योग्य निचरा करण्याकरीता घर तेथे शोषखड्डा अभियानांतर्गत शोषखड्डा उभाराणीच्या कामाचा शुभारंभ केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे
प्रत्येक कुटुंबाकडे तयार होणाऱ्या सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर तेथे शोषखड्डा हे आभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व जिल्हावासियांनी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी घर तेथे शोषखड्डा अभियान श्रमदान करुन शोषखड्ड्याचे बाधकाम करावे, असे आवाहन आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे.

