सरकारी हॉस्पिटल व अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्यावतीने ५ ते ७ ऑक्टोबर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
सावंतवाडी
जिल्हयातील विविध सरकारी हॉस्पिटल व अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते २ या वेळेत अनुक्रमे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग, महिला व बाल रुग्णालय कुडाळ, संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये मोफत हृदयविकार, अँजिओग्राफी, पित्ताशातील खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी, गुढघे व हाडाची तपासणी होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व बदलणे, दुर्बिणीद्वारे मूतखडा, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे, हाडाचे फॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर, केमोथेरपी, डायलेसीस, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेली थायरॉईड गाठीवर मायक्रोवेव द्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठीवर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेहामुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन, मणका ऑपरेशन हे सर्व रेशनकार्ड व आधार कार्डधारकांना मोफत करण्यात येणार आहेत. तसेच सवलतीच्या दरात हर्निया, अॅपेंडिक्स, मूळव्याध, फिशर, फिस्टुला ऑपरेशन करण्यात येणार असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व इतर ट्रस्टमार्फत गुडघे, खुबा प्रत्त्यारोपण वः दुर्बिणीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट ऑपरेशन या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरादिवशी ईसीजी, रक्तातील साखर, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांनी आपली नाव नोंदणी-८९२८७३६९९९ या नंबरवर संपर्क साधून करावी. शिबिराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

